स्वीटी ब्युटी पार्लरच्या संचालिका अनिता परदेशी यांचे निधन

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- डावरेगल्ली येथील प्रसिद्ध स्वीटी ब्युटी पार्लर व हेल्थ क्लबच्या संचालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त भंडारपाल श्री नंदकिशोर परदेशी यांच्या पत्नी अनिता नंदकिशोर परदेशी (५७) यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने नुकतेच निधन झाले.

त्यांच्या पश्चात मुलगा रोहन परदेशी व मुलगी नेहा परदेशी व पती असा परिवार आहे.ब्युटी पार्लर बरोबर त्या विविध सामाजिक कार्यात नेहमी भाग घेत.

मनमिळाऊ व धार्मिक वृत्ती असलेल्या स्व.अनिता परदेशी यांना अनेकदा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांचा मुलगा रोहन हा अहमदनगर शहरात प्रथितयश सिव्हिल इंजिनियर असून मुलगी अमेरिका येथे कॉम्प्युटर इंजिनीयर म्हणून कार्यरत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe