Ahmednagar News : सध्या पावसाळा सुरु असून या काळात डेंग्यू सारखे साथीचे आजार पसरत असतात. नगर जिल्ह्यात अद्याप तरी असा साथीचे आजाराचे संक्रमण झाले नाही. मात्र शेजारी असलेल्या नाशिकमध्ये मात्र डेंग्यूचा धोका कमी झाल्यानंतर आता स्वाईन फ्ल्यूचा धोका वाढल्याने आरोग्य यंत्रणेची देखील डोकेदुखी वाढली आहे.
एप्रिल महिन्यापासूनच नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. स्वाईन फ्ल्यूमुळे आतपर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्यामुळे चिंता वाढली आहे.
नाशिकमध्ये एप्रिल महिन्यापासूनच स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळला होता. सुरुवातीला डेंग्यूचा प्रसार झाला होता मात्र डेंग्यूचा धोका कमी झाल्यानंतर आता स्वाईन फ्ल्यूचा धोका वाढत चालला आहे. स्वाईन फ्ल्यूमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हा नाशिक जिल्ह्यातील स्वाईन फ्ल्यूचा दहावा बळी आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूने थैमान घातलं आहे. वाईन फ्ल्यूचा जिल्ह्यात दहावा बळी गेला आहे. निफाडमधील एका ५८ वर्षांच्या व्यक्तीचा स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. तर जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचे आणखी ६ नवे रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
नाशिक शहरातील स्वाईन फ्ल्यू बाधितांची संख्या ३५ तर ग्रामीण भागात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २५ वर पोहचली आहे. स्वाईन फ्ल्यूची रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याच्या आणि लक्षणं आढळल्यास त्वरित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.
उपचार घेत असलेल्या असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. मोठ्या प्रमाणात स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. स्वाईन फ्ल्यू झालेल्या रुग्णांच्या संपर्कातील लोकांचे स्वॅब नमुने घेवून तपासणी करणार येणार आहे.