अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- भारतात होणारा आयसीसी टी-20 विश्व विश्वचषक आता युएईत पार पडणार आहे. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा युएई आणि ओमन या देशांमधील मैदानात खेळवली जाणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने (ICC) दिली होती.
त्यावेळी या भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच गटात असल्याने यांचा सामना नेमका कधी असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर या सामन्याची तारीख आयसीसीने नुकतीच जाहीर केली आहे.
टी20 विश्वचषकादरम्यान, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये 24 ऑक्टोबर रोजी दुबई येथे सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळं हा ब्लॉकबस्टर सामना पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींनी आतापासूनच बेत आखण्यास सुरुवात केली आहे.
युएई अर्थात संयुक्त अरब अमिराती येथे ही स्पर्धा पार पडणार असून ओमान, अबुधाबी, दुबई आणि शारजाह येथे सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे.
असे असतील भारताचे विश्वचषकातील सामने
भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत.तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल.दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-
- भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
- भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
- भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
- भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)
- भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)
उपांत्य आणि अंतिम सामना 10 नोव्हेंबर रोजी टी20 विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना म्हणजेच सेमी फायनल अबू धाबी येथे खेळवण्यात येईल, तर 11 नोव्हेंबरला दुसरी सेमीफायनल होईल. या विश्वचषकाचा अंतिम सामना 14 नोव्हेंबरला दुबई येथे खेळण्यात येईल.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम