अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :- श्रीगोंदा पोलिसांनी भीमा नदीच्या पात्रात घारगाव शिवारात यांत्रिक फायबर बोटीच्या साहाय्याने विनापरवाना अवैध वाळूचा उपसा करणार्यांवर छापा टाकण्यात आला असून यात 26 लाखांच्या तीन बोटी पोलिसांनी फोडल्या आहे.
याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. राजेश मोरे, सुशांत मोरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, पोलीस पथकाने छापा टाकला असता घारगाव शिवारात भीमा नदीपात्रात राजेश मोरे,
सुशांत मोरे यांच्या मालकीच्या दोन फायबर व एक हायड्रोलिक बोट डिझेल इंजिनच्या साहाय्याने नदीपात्रात अवैधरीत्या वाळूचा उपसा करत असताना मिळून आल्या.
पोलिसांनी छापा टाकताच फायबर बोटी व सक्शनमधील माणसे पाण्यात उड्या मारून पळून गेली. पोलिसांनी दोन फायबर बोटी व एक हायड्रोलिक बोट असा सुमारे 26 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जिलेटीनच्या साहाय्याने तो नष्ट केला. दोन्ही संशयितांविरुद्ध श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम