मुंबईत कारमधून प्रवास करताना आजपासून घ्या ही काळजी

Published on -

Maharashtra News: मुंबईत कारमध्ये प्रवास करताना सीट बेल्ट लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. हा नियम १ नोव्हेंबरपासून लागू झाला आहे.

मात्र, दिलासा एवढात की आजच्या दिवशी वाहनचालकांना केवळ समज देण्यात येणार असून ११ नोव्हेंबरपासून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. कारचालक, पुढे बसलेले आणि मागील आसनावरील प्रवासी यांनाही सीट बेल्टची सक्ती करण्यात आली आहे.

मात्र, याला मोठा विरोध होत आहे. अजूनही अनेक वाहनचालकांनी सीट बेल्ट बसवलेले नाहीत. शिवाय वाहनचालकांमध्ये सीट बेल्टबाबत अजूनही जागृती न झाल्याने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मु्ंबईच्या वाहतूक पोलिसांनी शहरातील सर्व ट्रॅफिक यूनिटला दहा दिवस जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर कुणी सीट बेल्ट घातला नाही तर त्याच्याविरोधात कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News