Health Tips: पावसाळ्यात ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; नाहीतर वाढणार किडनीच्या समस्या, जाणून घ्या डिटेल्स 

Take care of 'these' things in the rainy season

Health Tips:  कडक उन्हानंतर येणारा मान्सून (Monsoon) दिलासा देणारा असला तरी सोबत अनेक समस्याही घेऊन येतो. या पावसाळ्यात (rainy season) घाण, दूषित पाणी आणि अन्न यांमुळे अनेक प्रकारच्या संसर्गाचा धोका वाढतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

यामुळे पोटापासून शरीराच्या इतर अनेक भागांमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या ऋतूत आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. गॅस्ट्रो, डेंग्यू, टायफॉइड, डायरिया यासारख्या समस्या या मोसमात मोठ्या प्रमाणात दिसून आल्या आहेत.

किडनीच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांसाठीही हा पावसाळा खूप आव्हानात्मक मानला जातो. पावसाळ्यात दमट वातावरणात वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास किडनीला संसर्ग किंवा नुकसान होऊ शकते.

लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, टायफॉइड, तीव्र गॅस्ट्रोएन्टेरिटिस, हिपॅटायटीस ए आणि ई या ऋतूमध्ये उद्भवणाऱ्या विविध आजारांमुळे मूत्रपिंडाचा दाह होऊ शकतो. अशा परिस्थितीत ज्या लोकांना आधीच किडनीचा त्रास आहे त्यांनी त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.  

तर जाणून घ्या कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी?

अन्न स्वच्छतेची काळजी घ्या

या पावसाळ्यात किडनी किंवा कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी अन्न आणि पाण्याच्या स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. पिण्याआधी पाणी उकळून गाळून घ्यावे, कारण पावसाळ्यात हा संसर्गाचा सर्वात सामान्य स्रोत आहे. याशिवाय घरचे ताजे अन्नच खाण्याचा प्रयत्न करा. बाहेर खाण्यात अस्वच्छतेचा धोका असू शकतो

रक्तदाब आणि साखर पातळी निरीक्षण

रक्तदाब आणि साखर या दोन्हींमध्ये सतत वाढ झाल्याने अनेक प्रकारच्या किडनीच्या समस्या वाढू शकतात. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासली पाहिजे. या दोन्ही गोष्टी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत राहा. किडनीच्या गंभीर समस्यांमध्ये रक्तदाब देखील एक प्रमुख घटक म्हणून पाहिला जातो.

फळे खाण्यापूर्वी चांगले धुवा

या हंगामात तुम्ही ताजी कापलेली फळे खात असल्याची खात्री करा, कारण कापलेल्या फळांवर सूक्ष्मजीव जमा होण्याचा धोका असतो. फळ खाण्यापूर्वी ते सोलून स्वच्छ केल्याने बाहेरील त्वचेवर जंतू किंवा बॅक्टेरियामुळे होणारा त्रास कमी होतो. त्याचप्रमाणे भाज्या नीट धुवून खाव्यात.

वैयक्तिक स्वच्छता सर्वात महत्वाची

पावसाळ्यात संसर्ग टाळण्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. घराभोवती स्वच्छतेची काळजी घ्या. आपले हात नियमितपणे धुणे फार महत्वाचे आहे, विशेषतः अन्न खाण्यापूर्वी आणि नंतर. हाताची स्वच्छता केवळ हंगामात संसर्गापासून तुमचे रक्षण करणार नाही, तर कोरोनाचा धोका कमी करण्याचा हा सर्वात योग्य मार्ग आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe