अहमदनगर Live24 टीम, 13 ऑक्टोबर 2021 :- राज्यात कोरोनाबाधितांची आकडेवारी घटत असताना दुसरीकडे मात्र नगर जिल्ह्याचा कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
यामुळे आधीच प्रशासनाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. यातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक गावांमध्ये लॉकडाऊन देखील घोषित करण्यात आला आहे.
दरम्यान नुकतेच कोरोना बाधितांच्या आकडेवारीमध्ये टॉप असलेल्या संगमनेरला पछाडत राहाता तालुक्याने अग्रस्थानी झेप घेतली आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी राहाता तालुक्यात 64 करोनाबाधित रुग्ण आढळूून आले असून 63 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
तर 255 अॅक्टीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. राहाता तालुक्यात आतापर्यंत 24595 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 24351 रुग्ण बरे होऊन घरी गेले. खासगी प्रयोगशाळेत 53 तर अँटीजेन चाचणीत 11 असे एकूण 64 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, सुरक्षित राहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम