म्युकरमायकोसिस व संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी ‘टास्कफोर्स’ !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :-  कोरोनामुक्तीनंतर काही रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस आजाराचे लक्षण आढळून येत आहे. तसेच कोरोनाच्या येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना बाधा होण्याची शक्यता आहे.

त्या पार्श्वभूमीवर आ. आशुतोष काळे यांनी आरोग्य विभाग व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तालुका टास्कफोर्स समिती तयार केली आहे. आपले संरक्षण करण्यासाठी प्रशासन सक्षम असून नागरिकांनी काळजी करू नये,असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.

आ. आशुतोष काळे म्हणाले कि, कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका हा मधुमेह, उच्च-रक्तदाब, हृदयरोग असलेल्या लोकांना अधिक झाला आहे. कोविडची बाधा झालेल्यांपैकी बहुतांशी रुग्ण इतर व्याधींनी ग्रस्त आहेत.

त्यापैकी अनेक रुग्ण कोरोनामुक्त झाले असले तरी देखील अशा रुग्णांना म्युकरमायकोसिस होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यासाठी आरोग्य विभागाने नागरिकांना विशेषत: कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांना सावधगिरीच्या सूचना देऊन जनजागृती करावी व योग्य ती काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करावे.

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना वेळेत उपचार उपलब्ध होवून रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची धावपळ होणार नाही यासाठी योग्य नियोजन करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.तसेच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या तिसऱ्या लाटेमुळे लहान मुलांना देखील जास्त प्रमाणात कोरोनाची बाधा होण्याचा धोका असल्याचे आरोग्य विभागाकडून सूचित करण्यात आले आहेत. त्याबाबत देखील आरोग्य विभाग व प्रशासनाने गाफील न राहता त्यासाठी आतापासूनच तयारीला लागावे.

अशा सूचना आ. काळे यांनी दिल्या. म्युकरमायकोसिस कोपरगाव तालुका टास्कफोर्स समिती अध्यक्ष म्हणून डॉ.कुणाल कोठारी, सदस्य-डॉ.अस्मिता लाडे, डॉ.अंजली फडके, डॉ,वैशाली बडदे, डॉ.कृष्णा फुलसौंदर यांची नेमणूक करण्यात आली आहे.

तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांचे संरक्षण करण्यासाठी देखील कोपरगाव तालुका टास्कफोर्स समितीची स्थापना करण्यात आली असून यामध्ये अध्यक्ष म्हणून डॉ.अजय गर्जे व सदस्य- डॉ.मयूर जोर्वेकर, डॉ. शंतनू सरवार, डॉ.वैशाली बडदे, सचिव म्हणून डॉ.अतिष काळे यांची नेमणूक करण्यात आली.

यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर, डॉ. वैशाली बडदे, संदीप रोहमारे, डॉ. अजय गर्जे, डॉ. अतिष काळे,

डॉ. दीपक पगारे, डॉ. शंतनू सरवार, डॉ. कुणाल घायतडकर, डॉ. अमोल अजमेरे, डॉ. अंजली फडके, डॉ. कुणाल कोठारी, डॉ. हेमंत राठी, डॉ. अस्मिता लाडे, डॉ. मयूर जोर्वेकर, डॉ. संतोष तिरमखे, डॉ. वरद गर्जे, डॉ. प्रियंका मुळे आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News