Tata Car Discounts : सणासुदीच्या काळात टाटाच्या ‘या’ कार्सवर मिळत आहे भरघोस सूट

Tata Car Discounts : वाहन विक्रीमध्ये टाटा मोटर्स (Tata Motors) ही कंपनी देशातील आघाडीची कंपनी आहे. ग्राहकांसाठी (Customers of Tata) ही कंपनी सतत नवनवीन कार्स बाजारत सादर करत असते.

सणासुदीच्या काळात (Festival season) ही कंपनी (Tata) आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही कार्सवर बंपर सूट (Discounts) देत आहे.

Tata Harrier

टाटा हॅरियरला (Tata Harrier) एक्सचेंज बोनस म्हणून सर्व प्रकारांवर 40,000 रुपयांची सूट दिली जात आहे. याशिवाय ग्राहकांना 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूटही मिळेल. Harrier SUV 168 bhp 2.0-लिटर डिझेल इंजिनला 6-स्पीड मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेली आहे.

Tata Safari

टाटा मोटर्सच्या फ्लॅगशिप कार सफारीवर (Tata Safari) एक्सचेंज बोनस म्हणून 40,000 रुपयांची सूटही मिळत आहे. मात्र, कंपनी या SUV वर कोणतीही कॉर्पोरेट सूट देत नाहीये.

टाटा सफारीला देखील तीच ड्राईव्ह ट्रेन मिळते जी हॅरियरमध्ये वापरली गेली आहे. या कारमध्ये 168 bhp डिझेल इंजिन देखील आहे. मात्र त्यात तीन ओळीच्या आसनांमुळे अधिक लोक प्रवास करू शकतात.

Tata Tigor

टाटा टिगोर (Tata Tigor) मॉडेल, ज्यामध्ये CNG प्रकार समाविष्ट आहे, 10,000 रुपयांची रोख सवलत आणि एक्सचेंज बोनस देखील मिळत आहे. Tata Tigor पेट्रोल व्हर्जनवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे.

ज्यामुळे या कारवर एकूण 20,000 रुपयांची सूट मिळते. तर CNG आवृत्तीवर 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळत आहे, जे एकूण 25,000 रुपयांचे फायदे आणते.

Tata Tiago

सेडानप्रमाणेच, हॅचबॅक टाटा टियागो ( Tata Tiago) पेट्रोल व्हर्जनवर 10,000 रुपयांची रोख सूट आणि 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळत आहे. यामुळे या कारवर एकूण सूट 20,000 रुपये झाली आहे.

ग्राहक 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील घेऊ शकतात जी Tiago च्या सर्व प्रकारांवर दिली जात आहे. नुकत्याच लाँच झालेल्या Tata Tiago EV आणि CNG व्हर्जनवर कोणतीही ऑफर नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe