Tata Nexon Offer : मागील महिन्यात सर्वच कंपन्यांनी आपल्या सर्व कारच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना जास्त पैसे खर्च करून कार खरेदी कराव्या लागत आहेत. अशातच जर तुम्ही स्वस्तात कार खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
तुम्ही आता खूप कमी किमतीत सर्वात लोकप्रिय Tata Nexon खरेदी करू शकता. तुम्ही ही कार Cars24 या वेबसाइटवरून ही कार खरेदी करू शकता. या ठिकाणी तुम्ही मूळ किमतीपेक्षा म्हणजे 5.35 लाख रुपयात खरेदी करू शकता.
जाणून घ्या ऑफर
वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, या ठिकाणी 2018 Tata Nexon XM 1.2 मॅन्युअल विक्रीसाठी सूचीबद्ध करण्यात आले आहे. या कारने सुमारे 74,292 किलोमीटरचे अंतर कापले असून कंपनीची ही पेट्रोल इंजिन असणारी कार आहे. जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला 5.35 लाख रुपये खर्च करावे लागणार आहे. या कारचा क्रमांक UP-14 पासून सुरू होत आहे.
तसेच कंपनीची 2018 Tata NEXON XMA 1.5 ऑटोमॅटिक कारने एकूण 94,046 किमी अंतर कापले आहे. या कारचा क्रमांक DL-8C पासून सुरू होत आहे. जर तुम्हाला ही खरेदी करायची असेल तर तुम्हाला 5 लाख 35 हजार रुपये मोजावे लागणार आहे. परंतु ही कार केवळ नोएडामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. ही कार पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे.
जाणून घ्या किंमत
कंपनीच्या या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत एकूण 7 लाख रुपये इतकी आहे. तर त्याचे टॉप मॉडेल खरेदी करण्यासाठी, ग्राहकांना आता 10 लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला शानदार कार खरेदी असल्यास तुमच्यासाठी Tata Nexon कार सर्वोत्तम पर्याय ठरेल.