Tata Punch : उद्यापासून एप्रिल महिन्याला सुरुवात होत आहे. मात्र या महिन्यात कार खरेदीदारांना मोठा झटका बसणार आहे. कारण या महिन्यापासून कारच्या किमतीत कमालीची वाढ होणार आहे. त्यामुळे खरेदीदारांना नवीन कार खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
अशातच तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण तुम्ही आता टाटा पंच फक्त 1 लाख रुपयांत घरी आणू शकता. ही कार 20.09 kmpl चे मायलेज देते असा दावा या कंपनीकडून करण्यात आला आहे. तसेच तगडे फीचर्स यात दिले आहेत. EMI किती असणार? जाणून घ्या
कसे आहे टाटा पंच इंजिन?
कंपनीकडून आपल्या टाटा पंच या कारमध्ये 1199 सीसीचे पेट्रोल इंजिन देण्यात आले असून हे इंजिन 6 गिअरबॉक्स मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनला जोडण्यात आले आहे.
किती आहे मायलेज?
मायलेजबाबत बोलायचे झाले तर कंपनीचा दावा आहे की ही तुम्हाला 20.09 kmpl चा मायलेज देऊ शकते. तसेच या कारचा लूकही खूपच स्टायलिश दिला आहे.
काय आहे फायनान्स प्लॅन?
कंपनीच्या या कारच्या बेस मॉडेलबद्दल बोलायचे झाल्यास या कारची ऑन-रोड किंमत सुमारे 6,62,599 रुपये इतकी असणार आहे. समजा तुम्ही या कारसाठी 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यास तुम्हाला त्यावर 5,62,599 रुपयांचे कर्जही उपलब्ध होऊ शकते. म्हणजेच, जर तुम्ही 9 टक्के व्याज दर आणि 5 वर्षांचा विचार केला तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला सुमारे 11,679 रुपयांचा EMI भरावा लागणार आहे. नंतर तुम्हाला 5 वर्षांत 1.40 लाख रुपयांपर्यंतचे व्याज द्यावे लागणार आहे.
जाणून घ्या किंमत
कार खरेदी करण्यापूर्वी हे लक्षात घ्या की कंपनीने या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत जवळपास 6 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर त्याचे टॉप मॉडेल खरेदी करण्यासाठी, तुम्हाला 9.54 लाख रुपये मोजावे लागणार आहेत.