Tata Safari : व्वा.. मस्तच! टाटा सफरीवर मिळत आहे जबरदस्त सवलत, होईल 40 हजार रुपयांची बचत

Published on -

Tata Safari : टाटा मोटर्स प्रत्येक वर्षी अनेक कार लाँच करत असते. त्यापैकी कंपनीची सफारी ही सर्वात शक्तिशाली कार आहे. या कारची क्रेझही तुम्हाला बाजारात पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने ही कार लाँच केली होती.

जर या कारच्या किमतीचा विचार केला तर या कारची तुम्हाला 15.65 लाख रुपये मोजावे लागणार आहे तर त्याचे टॉप मॉडेल खरेदी करण्यासाठी, तुम्हाला 25.02 लाख रुपये मोजावे लागतील. परंतु याच कारवर तुमची 40 हजार रुपयांची बचत होईल.

जाणून घ्या सवलत ऑफर

टाटा सफारीवर 25,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट, 10,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट आणि 5,000 रुपयांची ग्रामीण सवलत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

असे असतील फीचर्स

कंपनीकडून या कारमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स दिले जात आहेत. यात 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ओपन डोअर अलर्ट, फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ADAS फीचर, लेन डिपार्चर वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर आणि रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट यांसारखी अनेक शानदार फीचर्स पाहायला मिळत आहेत.

असे असेल इंजिन

तसेच या कारमध्ये दमदार इंजिनही दिले जात आहे. यामध्ये 2.0 लीटर डिझेल इंजिन देण्यात येत असून हे इंजिन BS6 फेज 2 कंप्लायंटसह लॉन्च केले आहे. आता तुम्हाला ही कार 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ट्रान्समिशन पर्यायासह खरेदी करता येईल.

किती आहे टाटा सफारीची किंमत?

कंपनीकडून या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 15.65 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर त्याचे टॉप मॉडेल खरेदी करण्यासाठी, तुम्हाला 25.02 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे जर तुम्हालाही उत्तम कार खरेदी करायची असल्यास टाटा सफारी तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe