Tata Tiago XE CNG : बाजारात सध्या अनेक कंपन्यांच्या कार्स उपलब्ध आहेत. इंधनाच्या किमती महाग झाल्या असल्याने आता प्रत्येकजण जास्त मायलेज देणारी कार खरेदी करत आहेत. सर्वच कारच्या किमती देखील वाढल्या आहेत.
जर तुम्ही सीएनजी कार खरेदी करणार असाल तर तुम्ही टाटा टियागो XE सीएनजी खरेदी करू शकता. विशेष म्हणजे तुम्ही फायनान्स प्लॅनच्या तपशीलांसह या हॅचबॅकचे सीएनजी व्हेरिएंट खरेदी करता येईल. कसे ते जाणून घ्या सविस्तर माहिती.
जाणून घ्या किंमत
किमतीचा विचार करायचा झाला तर टाटा टियागो XE सीएनजी बेस मॉडलची सुरुवातीची किंमत 6,54,900 रुपये (एक्स शोरूम, दिल्ली) आहे आणि ही किंमत ऑन रोड 7,40,938 रुपये इतकी आहे.
जाणून घ्या फायनान्स प्लॅन
समजा तुम्ही रोख पेमेंटवर Tata Tiago XE CNG खरेदी केले तर तुमचे बजेट 7.40 लाख रुपये इतके असावे. जर तुमच्याकडे इतके बजेट नसेल तर काळजी करू नका. तुम्ही फायनान्स प्लॅनद्वारे कार 52 हजार रुपये भरून ही खरेदी करू शकता.
तुमचे बजेट 52 हजार रुपये असल्यास तुम्ही ऑनलाइन फायनान्स प्लॅन कॅल्क्युलेटरनुसार, बँक या रकमेच्या आधारे तुम्हाला 6,88,938 रुपयांचे कर्ज देईल. या कर्जावर बँक 9.8 टक्के वार्षिक दराने व्याज आकारत आहे. हे लक्षात घ्या की हे कर्ज मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला टाटा टियागोसाठी 52 हजार रुपये डाउन पेमेंट जमा करावे लागणार आहेत.
इंजिन तपशील आणि मायलेज
Tata Tiago ला कंपनीने तीन-सिलेंडर 1199cc इंजिन दिले आहे जे 6000 rpm वर 72 bhp पॉवर आणि 3500 rpm वर 95 Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या इंजिनसोबत 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन जोडण्यात आले आहे. तसेच मायलेजबाबत, टाटा मोटर्सचा दावा आहे की टियागो एक किलो सीएनजीवर २६.४९ किलोमीटर मायलेज देईल. ,महत्त्वाचे म्हणजे हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.