Income Tax : करदात्यांचा आता एक महत्त्वाची बातमी आहे. कारण आर्थिक वर्ष 2022-23 साठी आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै ही आहे. त्यामुळे जर तुम्ही आता शेवटच्या तारखेनंतर आयटीआर भरला तर तुम्हाला मोठा दंड बसू शकतो.
तसेच तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते. हे लक्षात ठेवा की लवकरच आयकर रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे 31 जुलैपूर्वीच आयटीआर दाखल करा. नाहीतर तुमच्यावर रीतसर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.याबाबत जाणून घ्या सविस्तर.

अनेकदा वाढवल्या तारखा
मागील काही वर्षांपासून असे दिसून आले आहे की सरकारकडून वेगवेगळ्या कारणांमुळे आयटीआर फाइलिंगसाठी देय तारखा वाढवण्यात आल्या होत्या. मात्र, परंतु, आता मुदतवाढ दिली जाणार नाही, अशी अपेक्षा आहे. हे देखील कारण केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (CBDT) मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी नवीन ITR फॉर्म एक महिना अगोदर अधिसूचित करण्यात आले आहे. नवीन ITR फॉर्म 10 फेब्रुवारी रोजी CBDT द्वारे अधिसूचित केले असून ते प्राप्तिकर वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
दंड भरावा लागेल
हे लक्षात ठेवा की 1 एप्रिलपासून मूल्यांकन वर्ष 2023-24 सुरू होत असल्याने, करदात्यांना 1 एप्रिलपासून 2023-24 या आर्थिक वर्षात केलेल्या उत्पन्नाचे विवरणपत्र भरता येणार आहे. रिटर्न भरण्याची सुविधा 31 जुलैपर्यंत उपलब्ध असणार आहे. जर तुम्ही या तारखेपर्यंत ITR दाखल करू शकला नाही तर विलंब शुल्कासह ITR दाखल करण्याचा पर्याय आहे. परंतु आता 31 जुलै 2023 पर्यंत आयकर रिटर्न न भरणाऱ्यांना आयटीआर भरण्यासाठी दंड भरावा लागणार आहे.
ITR कुठे दाखल करावा?
आयकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाइटवर http://incometax.gov.in आयटीआर फाइल करण्याची सुविधा मोफत उपलब्ध असणार आहे. वेबसाइट वैयक्तिक आणि पगारदार करदात्यांना विशिष्ट इनपुट प्रदान करून त्यांचे स्वतःचे रिटर्न भरणे सोपे करते.
आयटीआर फॉर्ममध्ये नवीन काय असणार आहे?
आयकर विभागामार्फत अधिसूचित केलेल्या नवीन ITR फॉर्ममध्ये क्रिप्टो आणि इतर आभासी डिजिटल मालमत्तांमधून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी स्वतंत्र वेळापत्रकाचा समावेश आहे. सरकारकडून अर्थसंकल्पात क्रिप्टो उत्पन्नावर कर आकारणीचे नियम जाहीर करण्यात आले होते.