अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील दोन सराईत गुन्हेगारांना दोन वर्षाकरीता अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
फैय्याजोद्दीन अजिजोद्दीन शेख (रा. कादरी मस्जिदजवळ, मुकुंदनगर, नगर), पप्पू ऊर्फ दिनेश तुळशीराम वाघमारे (रा. हरीमळानगर, सोलापूर रोड, नगर) अशी हद्दपार केलेल्या आरोपींची नावे आहेत.

उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी हद्दपारीचा आदेश काढला आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गंभीरस्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपी शेख व वाघमारे विरोधात उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
त्याला मंजूरी मिळताच भिंगार कॅम्प पोलिसांनी वरील दोन्ही आरोपींना अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ अग्रवाल,
पोलीस उपअधीक्षक (नगर शहर) अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, पोलीस उपनिरीक्षक सतिष शिरसाठ, पोलीस अंमलदार सोनार, नगरे, रेवनाथ मिसाळ, बी. जी. खेडकर, आर. आर. द्वारके यांच्या पथकाने ही कामगिरी केली.