अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2021 :- राज्यातील सर्व विनाअनुदानित, अंशत: अनुदानित पदावर आणि तुकड्यांवर १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या सर्व शिक्षक,
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी जुनी पेन्शन फोर कमिटी व शिक्षण संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने हिवाळी अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर मुंबई येथील आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे.(Azad Maidan)
या आंदोलनात पेन्शन पासून वंचित असलेल्या शिक्षक, शिक्षकेतरांनी मुंडन आंदोलन करुन शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदवला. कोरोना काळात तसेच पेंशन नसल्यामुळे भविष्याच्या चिंतेतून बहुसंख्य शिक्षक मयत झाले आहेत.
१ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू व्हावी तसेच मयत शिक्षकांच्या पाल्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी आझाद मैदानावर दि.२३ डिसेंबर पासून महाविश्वास धरणे आंदोलन सुरू आहे.
आंदोलनाचा ३ रा दिवस असूनही सरकारने कोणतीच दखल न घेतल्यामुळे मयत शिक्षकांच्या स्मरणार्थ व शासनाच्या निषेधार्थ शिक्षक बांधव आज मुंडन केले आहे.
जुन्या पेन्शनसाठी सुरु असलेले आंदोलन दिवसंदिवस तीव्र होत असून, या आंदोलनास अनेक आमदारांचा व संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यातील शिक्षक आझाद मैदानात दाखल होत आहे.
शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील प्रश्न सुटत नसल्याने सोमवारी (दि.२७डिसेंबर) सामुदायिक आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.
या आंदोलनात संभाजी पाटील, श्रीधर गोंधळी, सुदेश जाधव, अजित गणाचारी, नागेश पाटील, राजमोहोम्मद देसाई, जी.आर पाटील, पंडित पाटील , किसन गांगुर्डे, मारुती वाघमारे यांनी मुंडण केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम