India T20 World Cup Schedule: एक नाही तर 4 सराव सामने खेळणार टीम इंडिया, जाणून घ्या ऑस्ट्रेलियाला कधी पोहोचणार; हे आहे संपूर्ण वेळापत्रक…

Ahmednagarlive24 office
Published:

India T20 World Cup Schedule: ऑस्ट्रेलिया (Australia) आणि दक्षिण आफ्रिकेला (south africa) त्यांच्याच घरात पराभूत केल्यानंतर टीम इंडियाचा (Team India) उत्साह उंचावला आहे. टीम इंडिया आता मिशन टी-20 वर्ल्डकपसाठी (T20 World Cup) सज्ज झाली असून गुरुवारी, 6 ऑक्टोबरला टीम इंडिया पर्थला रवाना होणार आहे. भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानसोबत (Pakistan) आहे, मात्र तेथील वातावरणात उतरण्यासाठी भारत काही दिवस आधीच प्रवास करत आहे.

टीम इंडिया ऑस्ट्रेलियातील त्यांच्या पहिल्या अधिकृत सामन्यापूर्वी एकूण 4 सराव सामने (practice matches) खेळणार आहे, ज्यामध्ये दोन ICC सराव सामने असतील, तर उर्वरित दोन BCCI द्वारेच आयोजित केले जातील, जे वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळले जातील.

T20 वर्ल्ड कपमधील टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे…

ऑस्ट्रेलियासाठी प्रस्थान: ६ ऑक्टोबर

सराव सामना

• वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इलेव्हन: 10 ऑक्टोबर
• वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इलेव्हन: 12 ऑक्टोबर
• विरुद्ध ऑस्ट्रेलिया: 17 ऑक्टोबर
• विरुद्ध न्यूझीलंड: 19 ऑक्टोबर

ऑफिशियल शेड्यूल:

• भारत विरुद्ध पाकिस्तान, 23 ऑक्टोबर, दुपारी 1.30 वाजता (मेलबर्न)
• भारत विरुद्ध गट अ उपविजेता, 27 ऑक्टोबर, दुपारी 12.30 वाजता (सिडनी)
• भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 30 ऑक्टोबर, दुपारी 4.30 (पर्थ)
• भारत विरुद्ध बांगलादेश, 2 नोव्हेंबर, दुपारी 1.30 वाजता (अ‍ॅडलेड)
• भारत विरुद्ध गट ब विजेता, 6 नोव्हेंबर दुपारी 1.30 वाजता (मेलबर्न)

T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

स्टँडबाय खेळाडू: मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.

टीम इंडिया दुखापतीने हैराण –

भारतीय संघ विश्वचषकासाठी जात असताना दुखापतीने त्यांची चिंता वाढवली आहे. जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे T20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. दीपक हुडा देखील अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही, अर्शदीप सिंग देखील पाठदुखीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा टी-20 सामना खेळू शकला नाही. जसप्रीत बुमराहच्या जागी टीम इंडियाने अद्याप निर्णय घेतलेला नाही, मोहम्मद शमीचा संघात समावेश केला जाईल, ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतरच त्याची घोषणा केली जाईल, असे मानले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe