Technology News Marathi : WhatsApp मध्ये येणार कमालीचे फिचर, पाहता येणार ‘ही’ गोष्ट

Content Team
Published:

Technology News Marathi : व्हॉट्सअॅप मध्ये नवनवीन अपडेट्स (Updates) मध्ये वेगळे फीचर्स (Features) येत असतात. त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा WhatsApp यूजर्सला होत असतो. तसेच या फीचर्समुळे व्हॉट्सअॅप वापरणे सोपे होऊन जाते.

आता रिपोर्टनुसार अजून एक नवीन बातमी येत आहे की, व्हॉट्सअॅप ग्रुप चॅटमध्ये पोल तयार करण्याची सुविधा देऊ शकते. WaBetaInfo ने याबाबत वृत्त दिले आहे.

तसेच रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, WhatsApp ने आपल्या iOS अॅपसाठी नवीन बीटा अपडेट सादर केले आहे. त्याची आवृत्ती 22.6.0.70 आहे. या बीटा अपडेटमध्ये मेटा-मालकांचा उल्लेख आहे.

ग्रुप पोलचे फीचर सध्या फेसबुक (facebook), मेसेंजर (Messenger), टेलिग्राम (Telegram), आणि इतर मेसेजिंग अॅप्समध्ये (Apps) उपलब्ध आहे. म्हणजेच व्हॉट्सअॅपने हे फिचर आधीच सादर केले आहे.

यानुसार व्हॉट्सअॅप ग्रुप पोलबाबत असे सांगण्यात आले आहे की यूजर्स कोणत्याही ग्रुप चॅटमध्ये पोल तयार करू शकतात. यामध्ये त्यांना मतदानाचा प्रश्न विचारण्यात येणार आहे.

यानंतर मतदान फक्त व्हॉट्सअॅप ग्रुपवर उपलब्ध असेल. म्हणजे जे ग्रुपमध्ये असतील त्यांनाच हा पोल आणि त्याचा निकाल पाहता येईल, अशी अट या फीचर मध्ये आहे.

तसेच या फीचरवर लवकरच Android साठी देखील चाचणी केली जाईल, आणि सर्वकाही व्यवस्थित राहिल्यास ते सर्वांसाठी रिलीज केले जाईल, असे सांगण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe