Tecno Phantom V Fold Offer : भारतीय टेक बाजारात सतत भन्नाट फीचर्ससह येणारे स्मार्टफोन लाँच होत असतात. लाँच होणाऱ्या सर्वच स्मार्टफोनमध्ये शानदार फीचर्स असल्याने त्याच्या किमतीही जास्त आहेत. अशातच सर्वात लोकप्रिय कंपनी टेक्नो आपला नवीन फोल्डेबल स्मार्टफोन लाँच होता.
सध्या या फोनच्या प्री-बुकिंगला सुरुवात झाली आहे. हा फोन सॅमसंगला जोरदार टक्कर देत आहे. 28 एप्रिलपासून या फोनच्या विक्रीला सुरुवात होणार आहे. तुम्ही 27 एप्रिलपूर्वी या फोनची बुकिंग करू शकता. तसेच ग्राहकांना शानदार गिफ्ट मिळत आहेत.

सर्वात विशेष म्हणजे कोणत्याही स्मार्टफोन एक्सचेंजवर Phantom V Fold सह अतिरिक्त रु 8,000 एक्सचेंज बोनस ग्राहकांना दिला जात आहे. हे लक्षात ठेवा कंपनीचा हा प्रीमियम दर्जाचा स्मार्टफोन असून जो ग्राहकांच्या मनावर सध्या राज्य करत आहे. या उत्तम ऑफरसह, तुम्ही ऑफरसह मेड इन इंडिया फोल्डेबल स्मार्टफोन सहज विकत घेऊ शकता.
जाणून घ्या ऑफर
कंपनीच्या शक्तिशाली फोनच्या प्री-बुकिंगवर २४ महिने नो कॉस्ट ईएमआय पर्याय देण्यात येत आहेत. तुम्ही हा फोन रु.3704 पासून मासिक हप्त्यांमध्ये सहज घरी नेऊ शकता. इतकेच नाही तर ग्राहकांना आता मर्यादित स्टॉकसाठी 5000 रुपयांची मोफत गिफ्ट, 6 महिन्यांत मोफत एक वेळ स्क्रीन रिप्लेसमेंट, मोफत पिक अँड ड्रॉप सेवा, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी आणि HDB फायनान्शिअल सर्व्हिसेससह 5,000 रुपयांचा कॅश बॅक ऑफर मिळत आहे.
किती असणार किंमत?
Phantom चा हा फोल्ड करण्यायोग्य स्मार्टफोनसाठी 7.85 सर्वात मोठ्या स्क्रीन आकारासह देशातील पहिला पूर्ण आकाराचा फोल्ड आहे. या फोनच्या पहिल्या विक्रीला देशात 28 एप्रिल 2022 पासून सुरूवात होत आहे. जो तुम्ही सहज अॅमेझॉन आणि रिटेल स्टोअरमधून फोन खरेदी करू शकाल. जर या फोनच्या किमतीचा विचार केला तर त्याची किंमत 88,888 रुपये इतकी आहे.













