Tecno Spark 10 Pro : शक्तिशाली फीचर्ससह भारतात लॉन्च झाला नवीन स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स ..

Ahmednagarlive24 office
Published:

Tecno Spark 10 Pro : सध्याच्या काळात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ग्राहक आता भन्नाट फीचर्स असणारे स्मार्टफोन विकत घेऊ लागले आहेत. त्यामुळे आता कंपन्याही शक्तिशाली फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करू लागल्या आहेत.

मागणी आणि फीचर्स नवीन असल्यामुळे कंपन्यांनी स्मार्टफोनच्या किमती वाढवल्या आहेत. अशातच आता Tecno या टेक कंपनीने आपला आणखी एक नवीन स्मार्टफोन शक्तिशाली फीचर्ससह भारतात लॉन्च केला आहे. कंपनीच्या या स्मार्टफोनची किंमत काय असणार? त्यात कोणते फीचर्स मिळणार याबद्दल जाणून घ्या सविस्तर.

काय असणार किंमत?

टेक्नोचा नवा फोन एंट्री लेव्हल स्मार्टफोन म्हणून सादर केला आहे. कंपनीचा हा नवीन फोन लूनर एक्लिप्स, पर्ल व्हाइट आणि स्टाररी ब्लॅक या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येत आहे. या फोनच्या 6 GB रॅमसह 128 GB स्टोरेजची किंमत 12,499 रुपये इतकी आहे. हा फोन भारतात 24 मार्चपासून सर्व भागीदार स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

काय आहेत स्पेसिफिकेशन?

कंपनीच्या या नवीन स्मार्टफोनला Android 13 आधारित HiOS 12.6 आउट-ऑफ-द-बॉक्स मिळत आहे. तसेच या फोनमध्ये 6.8-इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले दिला असून जो 90Hz रिफ्रेश रेट आणि 270Hz टच सॅम्पलिंग रेट आणि (2460 x 1080 पिक्सेल) सह येतो. या फोनमध्ये MediaTek Helio G88 प्रोसेसरसह 8 GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम आणि 8 GB पर्यंत LPDDR5 रॅमसाठी समर्थन आहे. फोनमध्ये UFS 3.1 इनबिल्ट स्टोरेज 128GB पर्यंत उपलब्ध असणार आहे.

कसा असणार कॅमेरा?

या फोनसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध असून ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक सेन्सर उपलब्ध आहे. कंपनीच्या या फोनसोबत मागील कॅमेरासोबत एलईडी फ्लॅशही उपलब्ध आहे. तसेच इतर दोन कॅमेऱ्यांना वाइड अँगल आणि मॅक्रो लेन्स मिळत आहेत. तर फोनमध्ये ड्युअल एलईडी फ्लॅशलाइटसह 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात येत आहे.

कशी असणार फोनची बॅटरी?

कंपनीच्या या फोनवरील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, एनएफसी, एक 3.5 मिमी ऑडिओ जॅक आणि चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट यांचा समावेश असणार आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी दिली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe