अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- एकीकडे वटपोर्णिमेच्या दिवशी जन्मोजन्मी हाच पती मिळावा’ यासाठी विवाहित महिला प्रार्थना करत होत्या तर दुसरीकडे अशीच प्रार्थना करत असलेल्या महिलेवर पतीनं धारदार शस्त्राने वार केल्याची घटना समोर आली आहे.
यात मुलीचा कानही कापला आहे. या दुर्दैवी घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेस सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याठिकाणी महिलेवर उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
संबंधित हल्ला करणाऱ्या पतीचे नाव संभाजी विष्णू पाटोळे असून तो वागदरी येथील रहिवासी आहे. पाटोळे काल आपल्या तीन लहान मुली आणि पत्नी पूनम यांना दुचाकीवर घेऊन वागदरीमार्गे अक्कोलकोटकडे येत होता.
दरम्यान त्याने वाटेत दुचाकी थांबवली. येथील एका दर्ग्यामागे नेऊन पत्नीवर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात पत्नी मदतीसाठी याचना करत होती.
मात्र पती तिच्यावर वार केले. तो एवढ्यावरचं थांबला नाही, तर त्याने आपल्या पोटच्या मुलीवरही हल्ला केला.
यात लहान मुलाचा कान कापला आहे. हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणासाठी केला? हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम