आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- ओबीसी आरक्षण टिकविण्यात आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यात महाविकास आघाडी सरकारला आलेल्या

अपयशाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने शनिवारी सकाळी १०.३० वाजता भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन आयोजित करण्यात आले असल्याची माहीती तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर यांनी दिली.

राहाता शहरातील विरभद्र चौकात होणा-या या चक्काजाम आंदोलनात भारतीय जनता पक्षाचे जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर, भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्‍हाध्‍यक्ष बाळासाहेब गाडेकर यांच्‍यासह सर्व पदाधिकारी,

कार्यकर्ते आणि विविध आघाड्यांचे प्रमुख सहभागी होणार असून, आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या ओबीसी, मराठा समाजातील विविध संघटनांना सुध्दा या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे ज्ञानेश्वर गोंदकर यांनी सांगितले.

राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मराठा समाजाला कायद्याच्या आधारे आरक्षण मिळवून दिले. मात्र सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने हे आरक्षण टिकविण्यात केलल्या हलगर्जी पणामुळेच समाजाला आरक्षण गमवावे लागले.

ओबीसी समाजाला असलेल्या राजकीय आरक्षणाच्या बाबतीतही महाविकास आघाडी सरकारचे अपयश उघड झाले. आवश्यक असलेली पूर्तता न केल्याने सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे आरक्षणही रद्द केले.

यामुळे ओबीसी व मराठा समाजामध्‍ये तीव्र संताप आहे. सरकारच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यात शनिवारी चक्काजाम आंदोलन आयोजित केले आहे.

राहाता तालुक्यात भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार असून माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्यासह महीला, युवक, कार्यकर्ते विविध आघाड्यांचे प्रमुख सहभागी होणार असून

या चक्काजाम आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भाजपाचे तालुका अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर गोंदकर, अॅड.रघुनाथ बोठे, ओबीसी मार्चा सेलचे प्रमुख स्‍वानंद गाडेकर, भाजयुमो तालुका अध्‍यक्ष सतिष बावके, भाजपा कृषी सेलचे तालुका अध्‍यक्ष बाळासाहेब डांगे,

शिर्डीचे नगराध्‍यक्ष शिवाजीराव गोंदकर, राहाता नगरपरिषदेच्‍या नगराध्‍यक्षा सौ.ममता पिपाडा, पंचायत समितीच्‍या सभापती सौ.नंदाताई तांबे, चेअरमन मुकूंदराव सदाफळ, प्रतापराव जगताप, बाळासाहेब जपे यांनी केले आहे.