घराची स्वच्छता ही आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे प्रत्येक जण घर आणि आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असतात. परंतु घराची स्वच्छता मोठ्या प्रमाणावर ठेवून देखील घरामध्ये बऱ्याचदा झुरळ, लाल मुंग्या आणि उंदरा सारख्या कीटकांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झालेला आपल्याला पाहायला मिळतो.
या सर्वांमध्ये उंदीर हा खूप त्रासदायक असतो यामुळे अनेकदा घरात ठेवलेल्या धान्याची व इतर महत्त्वाच्या गोष्टींची खूप मोठ्या प्रमाणावर नासाडी होते. त्यामुळे उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक नाना तऱ्हेचे प्रयोग अवलंबले जातात. यामध्ये प्रमुख्याने रॅट किलरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.
परंतु भारतीय संस्कृतीमध्ये गणपतीचे वाहन म्हणून उंदीर ओळखला जातो व या दृष्टिकोनातून काही जणांना उंदरांना मारणे योग्य वाटत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर घरामध्ये उंदरांचा सुळसुळाट वाढतो व अनेक वस्तूंचे नुकसान उंदीर करतात. परंतु तुम्हाला जर उंदीर न मारता त्यांना घरातून पळून लावायचे असेल तर एक जपानी ट्रिक खूप फायद्याचे आहे. नेमकी काय आहे ही ट्रिक? याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.
उंदीर पळवून लावण्यासाठीच्या जपानी ट्रिक मागील रहस्य
जपान या देशाची राजधानी असलेल्या टोकियो शहराच्या एका परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर उंदरांचा प्रादुर्भाव झालेला होता. जवळजवळ 2019 आणि 2022 या कालावधीत जवळपास दोनशे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या व त्यानंतर यासंबंधीच्या तक्रारीने 400 आकडा पार केला.
या वाढत्या उंदरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्या भागात कचरा वेचणाऱ्या ज्या काही कंपन्या होत्या त्यांच्यासोबत मिळून एक उपाय राबवण्याचे ठरवले. या उपायांमध्ये पुदिना आणि काही औषधी वनस्पतींच्या सुगंधाच्या कचराच्या पिशव्यांचा वापर करण्यात आला.
हा जो काही वास होता हा उंदरांना सहन झाला नाही व त्यामुळे उंदीर दूर पळून जातात हे या उपायामुळे दिसून आले. कारण उंदीर हा एक खूप संवेदनशील प्राणी आहे व थोडा जरी सुगंध त्यांना आला तर तो त्यांना समजतो. त्यामध्ये पुदिनाचा वापर केल्यामुळे त्याचा उग्र वास आणि वैशिष्ट्यपूर्ण ताजेपणा असल्यामुळे उंदरांना ते आवडत नाही.
यावरून दिसून आले की पुदिनाचा वास उंदरांना आवडत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने पेपरमिंट ऑइलचा वापर करून उंदीर घरातून पळवून लावता येतील व ते परत त्या ठिकाणी येणार नाहीत याची देखील खात्री झाली.
हा उपाय घरात कसा काय करता येईल?
1- यामध्ये कापसाच्या बोळ्यात पेपरमिंट ऑइलचे काही थेंब टाकून तो कापसाचा बोळा भिजवून घ्यावा. घरातील ज्या ठिकाणी उंदीर जास्त प्रमाणामध्ये दिसतात त्या ठिकाणी ते बोळे ठेवावेत. हा वास त्या कोपऱ्यात किंवा त्या ठिकाणी सतत राहावा अशी सोय करावी. याकरिता सतत तीन दिवस ते कापसाचे भिजवलेले गोळे बदलत राहावेत.
2- यातील दुसरा उपाय म्हणजे पेपरमिंट ऑइलमध्ये पांढरे विनेगार आणि डिटर्जंट पावडर एकमेकांत मिसळून ते वेगवेगळ्या ठिकाणी शिंपडून घ्यावे. एक कप पांढरे व्हिनेगर, तीन-चार थेंब भांड्यांचा लिक्विड साबण आणि दोन कप पाणी मिसळावे. यामध्ये साधारणपणे 10 थेंब पेपरमिंट ऑइल घालावे. या मिश्रणाच्या वासाने देखील उंदीर पळून जातात.
3- पेपरमिंट ऑइलचा वास आणखी उग्र करण्याकरिता त्यामध्ये दालचिनी,सिंट्रोनेला गवताचे तेल आणि निलगिरी तेलाचा वापर केला तर जास्त फायदा मिळतो.
4- तसेच चौथे म्हणजे पेपरमिंट ऑइलमध्ये फक्त पाणी मिसळून सुद्धा तुम्ही ते ज्या ठिकाणी उंदीर आहे त्या ठिकाणी शिंपडू शकतात.