Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एक धक्का देणारा प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीच्या गरिबीचा गैरफायदा घेऊन तिच्यासोबत मोठा अन्याय व मोठा छळ झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
धक्कादायक म्हणजे स्वतः पत्रकार असल्याचे खोटे सांगत हा सगळा प्रकार सुरु झाल्याचे समोर आले आहे. अकोले तालुक्यातील राजूर येथील चांद सरदार शेख याने कोतूळ येथील एका अल्पवयीन मुलीच्या गरिबीचा गैरफायदा घेऊन त्या मुलीसोबत आपल्या तोतया पत्रकार मुलाचे लग्न लावले.
मात्र आपल्या बाहेरख्याली पतीदेवाचे इतर महिलासोबत संबंध असल्याचे नववधूच्या लक्षात आले. तोपर्यंत ही अल्पवयीन मुलगी पती दाऊद शेख याच्यामुळे गर्भवती राहिली. पीडितेने राजूर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरून पाच आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पती दाऊद चांद शेख, सासू आरिफा चांद शेख, सासरा चांद सरदार शेख, दीर रियाज चांद शेख, आते सासू अवेदा या पाच जणांवर राजूर पोलीसांकडून कारवाई करण्यात येत आहे.
१९ वर्षीय या पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे की, १२ मे २०२३ रोजी राजूर येथील दाऊद चांद शेख याच्यासोबत कोतूळ येथील एका मंगल कार्यालयात बळजबरीने माझा विवाह करण्यात आला.
आपली मुलगी अल्पवयीन असल्याने पीडितेच्या आईने या लग्नाला विरोध केला. लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून सासरा, सासू आरिफा, दीर रियाज व आत्या सासू यांच्याकडून नववधुचा शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला.
त्यामुळे लग्नानंतर महिन्याभरातच तिला माहेरी यावे केला लागले. या मुलीवर सासरच्यांकडून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिच्या पोटातील गर्भ पाडण्यासाठी तिच्यावर दबाव आणण्याचे प्रयत्न झाले.
अनेकदा चांद मारहाण करत, नवरा दाऊद शेखसह सासू, सासरा, दीर, आत्या यांनी हिंसाचार, मारहाण, शिवीगाळ व धमकी दिल्याची तक्रार मुलीने केली पीडितेच्या सासू-सासऱ्यांसह दीर व आत्या सासूने त्यांनाही काठीने बेदम मारहाण केली. पीडितेच्या कुटुंबीयांनीच तिला अत्यवस्थ अवस्थेत सुरुवातीला राजूर पोलीस ठाणे
व त्यानंतर राजूरच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र तिची प्रकृती नाजूक असल्याने तिला नाशिकच्या यावेळी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेत चांद सरदार शेख याने धमक्या व बळजबरीने अल्पवयीन मुलींचे विवाह लावून बालविवाह कायद्याचा भंग केला म्हणून त्यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी केली.
याप्रकरणी १९ वर्षीय पीडितेने राजूर पोलिस -ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरुन पोलिस ठाण्यात आरोपी नवरा दाऊद चांद शेख, सासू आरिफा चांद शेख, सासरा चांद सरदार शेख, दीर रियाज चांद शेख, आते सासू अवेदा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.