अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Government scheme :- एक दीड महिन्यांपूर्वी केंद्र सरकारचा (Central Government) अर्थसंकल्प सादर झाला होता त्या केंद्रीय अर्थसंकल्पात माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Central Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी कृषी क्षेत्रासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना भारत सरकार राबवणार असल्याचे सांगितले होते.
केंद्रीय बजेट मध्ये शेतकरी बांधवांसाठी ज्या पद्धतीने झुकते माप ठेवण्यात आले अगदी त्याच धर्तीवर नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) देखील आपल्या अर्थसंकल्पात (Maharashtra Budget) शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवले असून बजेटमध्ये अनेक शेतकरी हिताचे निर्णय महाविकास आघाडी सरकार घेणार असल्याचे सांगितले गेले.

अर्थसंकल्पात महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून अजित दादा पवार (Ajit Pawar) यांनी अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले. यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले गेले.
सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांनी (Co-operation Minister Balasaheb Patil) देखील आता एक मोठा निर्णय घेतला आहे. आता ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी राहिलेली आहे अशा शेतकऱ्यांना संबंधित बँकांनी कर्जफेड करण्यासाठी दबाव आणू नये असा आदेश त्यांनी काढला आहे.
यामुळे महात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांची अजून कर्जमाफी राहिलेली आहे त्यांच्यासाठी ही निश्चितच आनंदाची बाब आहे.
महात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना अंतर्गत राज्यात जवळपास 54 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी ही प्रलंबित आहे. या शेतकऱ्यांची कर्जमाफी 31 मार्च अखेर पर्यंत करण्याचा सरकारचा मानस आहे.
महात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना अंतर्गत शेतकऱ्यांचे दोन लाख पर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. एकंदरीत 31 मार्च अखेरपर्यंत राज्यातील या योजनेसाठी पात्र सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे.
या दरम्यान स्थानिक पातळीवर व्याजाची रक्कम भरल्यावरच् कर्जमाफीस पात्र असणार असल्याचा अपप्रचार सुरू असल्याची धक्कादायक घटना उघडकीस येऊ लागल्या होत्या.
मात्र आता सहकार मंत्री यांनी याबाबत जनतेस अवगत केल्याने शेतकरी बांधवांमध्ये आनंदी वातावरण बघायला मिळत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अनेक बँका व्याज भरले तरच कर्जमाफीचा लाभ मिळणार म्हणून वसुली करत होते, त्यामुळे सहकार मंत्री पाटलांनी ज्या बँका अशा पद्धतीने वसुली करत असतील त्यांची तक्रार करण्याचे आव्हान केले आहे. बँक अधिकाऱ्यांनी देखील याबाबत आपणास सांगितले तरी देखील कर्जफेड करू नये.
उर्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफी 31 मार्च अखेर आता ठरलेलीच आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील आता आगामी काही दिवसात 50 हजार रुपये दिले जाणार असल्याचे बाळासाहेब पाटलांनी स्पष्ट केले आहे यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे.