Ahmednagar : थोरातांच्या काळातील ‘त्या’ कारभाराची चौकशी होणार ; विखे-पाटलांचा इशारा,अनेक चर्चांना उधाण

'That' administration during the time of Thorat will be investigated

Ahmednagar : नुकतंच शिंदे सरकारच्या (Shinde government) मंत्री मंडळ विस्तार करण्यात आला आहे. शिंदे सरकारच्या मंत्री मंडळात भारतीय जनता पक्षाचे (BJP) जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी राज्याचे नवीन महसूल मंत्री (Minister of Revenue) म्हणून शपथ घेतली आहे.

यानंतर आज अहमदनगर (Ahmednagar ) मध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना विखे पाटील यांनी मागच्या सरकारच्या कार्यकाळात घेण्यात आलेल्या निर्णयांची चौकशी करण्याचे संकेत दिले आहे. यामुळे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा विखे-पाटील आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यात आरोप – प्रत्यारोप सुरू झाले आहे. मागच्या सरकारच्या काळात महसूल खात हे काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे होते.

त्यामुळे आता विखे-पाटलांकडून महसूल खात्यातील पूर्वीच्या निर्णयांच्या चौकशीद्वारे बाळासाहेब थोरात यांना लक्ष्य केले जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सोमवारी अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, मागील काळात महसूल खात्यामध्ये काय घडले आहे, याची चौकशी करावी लागेल. मात्र, येणाऱ्या काळामध्ये पूर्वीसारखे आरोप होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे. भ्रष्टाचारमुक्त सरकार हाच अजेंडा या सरकारचाच आहे, असेही विखे-पाटील यांनी म्हटले.

यावेळी विखे-पाटील यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाई संदर्भातही भाष्य केले. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, असे विखे-पाटील यांनी म्हटले.

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते अहमदनगरच्या पोलीस परेड ग्राउंडवर ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विनायक मेटे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. विनायक मेटे यांच्या निधनाने मराठा समाजाचे कधी न भरून येणार नुकसान झाले आहे. एक उमदे नेतृत्व हरवले आहे. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे त्यांचे स्वप्न अधुरंच राहिलं.

मराठा समाजासाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या विनायक मेटे यांना अहमदनगर जिल्ह्याच्यावतीने विखे-पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.

बिनखात्याचे मंत्री – बाळासाहेब थोरात

शिंदे-फडणवीस सरकारने राधाकृष्ण विखे-पाटील यांना फक्त मंत्रिपद मिळाले होते, तेव्हा त्यांना शाब्दिक चिमटा काढला होता. बाळासाहेब थोरात यांनी विखे-पाटलांना बिनखात्याचे मंत्री म्हणून हिणवले होते. त्याला विखे-पाटलांनी चोख प्रत्युत्तर दिले होते.

महाविकास आघाडी सरकारमध्ये नगर जिल्ह्यात तीन मंत्री असताना त्यांनी कोणता प्रकल्प जिल्ह्यात आणला? केवळ वाळू उपसायची, हा एकच उद्योग नगर जिल्ह्यात सुरू होता. आता सत्ता गेल्याने जलबिना मछली अशी अवस्था झाल्याने ते तडफडत आहेत.

आपल्या जिल्ह्यातील एक वरिष्ठ मंत्री होते, ते आमच्यावर बिनखात्याचे मंत्री झेंडावंदन करणार असल्याची टीका करत आहेत. मात्र त्यांनी आमची चिंता करू नये. ज्यावेळी खातेवाटप होईल त्यावेळी तुमची काय अवस्था होईल याचा पहिल्यांदा विचार करा, अशा शब्दांत विखे-पाटील यांनी थोरांतावर निशाणा साधला होता.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe