Maharashtra News : मुंबईत अधिवेशनाच्या तोंडावर विधान भवानातील शिवसेना पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने प्रयत्न केला होता. मात्र, सावध झालेल्या शिवसेनेने आधीच ते कार्यालय सील करून तो प्रयत्न हाणून पाडला.
आता आमदारांप्रमाणेच दिल्लीत खासदारही फुटले आहेत. त्यामुळे मुंबईत फसलेला प्रयोग यशस्वी करण्यासाठी दिल्लीत हालचाली सुरू झाल्या आहेत. संसदेतील शिवसेना पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाने लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहिले आहे.

या पत्रात कार्यालयाचा ताबा देण्याची ही मागणी केली आहे. दोन तृतीयांश पेक्षा अधिक बहुमत आपल्याकडे असल्याचा दावा करीत शिंदे गटाने आणखी काही मागण्यांचे पत्र अध्यक्षांना दिले आहे.
मुंबईत या हलाचाली झाल्या, तेव्हा राज्यात विधान सभेचे अध्यक्षपद शिवसेनेकडे होते. दिल्लीत मात्र शिंदे गटाला यादृष्टीने अनुकूल परिस्थिती आहे. त्यामुळे तेथे त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होण्याची जास्त शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.













