मुंबईला धमकी देणारा तो मेसेज थेट पाकिस्तानमधून

Published on -

Maharashtra News ;मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रूमच्या व्हॉट्सअॅप नंबरवरती धमकीचा मेसेज पाकिस्तानमधून असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिली आहे.

२६/११ सारखा मुंबईत हल्ला करण्याची धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली आहे. त्याचा तपास मुंबई पोलिसांनी सुरू केला. तेव्हा हा नंबर पाकिस्तानमधील एका सामान्य व्यक्तीचा असल्याचे स्पष्ट झाले.

मोहम्मद इम्तियाज असे हा नंबर वापरणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. मात्र त्याला या मेसेजबाबत काहीच कल्पना नाही. इम्तियाज पाकिस्तानातील लाहोरचा आहे.

तो पाकिस्तानमध्ये सरकारी कर्मचारी आहे. विशेष म्हणजे तो सामान्य कीपॅड असणारा साधा फोन वापरत असल्याने त्यामध्ये व्हॉट्सअॅप नाही.

इम्तियाजने त्याचा फोन काही दिवसांपूर्वी हरवल्याचा दावा केला आहे. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. त्यासोबतच दुसऱ्या तपास यंत्रणांनाही याची माहिती दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News