अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 maharashtra news :- राज्यातील महाविदयालयांच्या परीक्षांसंबंधी मोठी बातमी समोर आली आहे. सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
त्यानुसार या परीक्षा ऑनलाइन नव्हे तर ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. त्या मे नव्हे तर जूनमध्ये सुरू होणार आहेत.

यासंबंधी माहिती देताना मंत्री सामंत यांनी म्हटलं आहे, ‘कुलगुरूंच्या बैठकीमध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्यासंदर्भात बहुसंख्य विद्यापीठांचे कुलगुरु ठाम आहेत.
परीक्षा घेताना विद्यार्थ्यांना प्रश्नसंच विद्यापीठ देणार आहे. दोन पेपर मध्ये दोन दिवसाचे अंतर असणार आहे. परीक्षा मे महिन्यात न घेता १ जून ते १५ जलैपर्यंत होतील, असे सर्व कुलगुरूनी निश्चित केले आहे.’
असे सामंत यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत अभ्यासाला लागून जून-जुलैमध्ये ऑफलाइन परीक्षा देण्याची तयारी करावी लागणार आहे.