अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2021 :- अंधारात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने तयारीत असलेल्या पुणे जिल्ह्यातील आरोपींना हत्यारासह व गाडीसह श्रीरामपूर शहर पोलिसांनी पकडले. हि घटना श्रीरामपूर नेवासा रस्त्यावर शिरसगाव शिवारात ओव्हरब्रीज जवळ घडली आहे.
दरम्यान दरोडेखोरांकडून पोलिसांनी 1 लाख 88 हजार 240 रुपांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक साईनाथ राशिनकर यांनी फिर्याद दाखल केली आहे.
त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या सुचनेप्रमाणे शहर पोलीस रात्री पेट्रोलिंग करत असताना
2.30 वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावर शिरसगाव शिवारात ओव्हर ब्रीजजवळ रोडच्या बाजूला अंधारात काही आरोपी गाडीसह संशयितरित्या दिसून आले.
पोलिसांनी तातडीने ती गाडी पकडली. काही आरोपींना पकडले तर काही आरोपी अंधारात पळून गेले. पकडलेल्या आरोपींजवळून मोबाईल हॅण्डसेट रोख रक्कम धारदार चाकू, व्हेक्सा ब्लेड, नायलॉन दोरी, लोखंडी कटावणी असा 1 लाख 88 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
आरोपींची नावे खालीलप्रमाणे
खलील महेबुब कुरेशी, (वय 45), रा. शनि मंदिरासमोर, शुक्रवार पेठ, जुन्नर, जि. पुणे,
तुषार अरुण रोकडे, (वय 24), रा. भिमनगर, पाडळी नाका, नं. 1, जुन्नर, जि. पुणे,
अरबाज कुतुबद्दीन शेख, (वय 21) रा. बारव, जुन्नर, जि. पुणे,
तौफिक हबीब इनामदार, (वय 34) रा. आगरपेठ, जुन्नर जि. पुणे,
मोबीन रशिद आत्तार, (वय 20) रा. नारायणगाव बसस्टॅण्डच्या मागे, ता. जुन्नर जि. पुणे,
समीर शिंदे, रा. जुन्नर (पळून गेलेला)
वरील सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 5 आरोपींनी अटक करण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम