Maharashtra news : विविध कारणांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या अभिजीत बिचुकले यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे.
राष्ट्रपतींना बऱ्याच गोष्टी करता येतात, पण सध्याच्या परिस्थितीत त्या करता येत नाहीत, त्या मला करून दाखवायच्या आहेत, असे बिचुकले यांनी सांगितले.बिचुकले यांनी यापूर्वी राष्ट्रपतीपद, खासदार आणि आमदारकी अशा अनेक निवडणुका लढविल्या आहेत.

आता त्यांनी थेट राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उडी घेण्याचे ठरविले आहे. आपण सध्या पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही आमदारांशी खासदारांशी अनुमोदनासंबंधी बोलत आहोत. ते काम झाले की माझा उमेदवारी अर्ज नक्कीच जाणार आहे.
मागील वेळीच आपण यासाठी प्रयत्न केला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत गेलो होता. मात्र, त्यांना कोणीतरी रामानाथ कोविंद यांच्याबद्दल सांगितले. त्यांना बहुमतामुळे ते जमले. आता मी देशातील आमदार, खासदार यांच्याशी बोलत आहे. सांगली, कोल्हापूर, पुण्यातील खासदारांशी चर्चा सुरू आहे, असेही बिचुकले म्हणाले.