अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :- नेवासा-शेवगाव रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे. दरम्यान या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. यामुळे वाहनधारकांचे मोठे हाल होत होते. तसेच रस्त्यावरील खड्याच्या मुद्द्यावरून नेवासा तालुक्यातील प्रहार, भाजपसह विविध संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.
नेवासा-शेवगाव व नेवासा-श्रीरामपूर राज्य मार्गावर मोठं मोठी खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे असा प्रश्न या रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांना पडत आहे.
रस्त्यातील खड्डे हुकविण्याच्या प्रयत्नांत अनेक अपघात होऊन काही प्रवाशांना जीव गमवावा लागला तर काहींना अपंगत्व आले. वाहनांचे ही अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे या मार्गावरील रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्ष, भाजपा व इतर संघटनांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
त्याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने गणेशोत्वाचे मुहूर्तावर नेवासा-शेवगाव रस्त्याची दुरुस्ती हाती घेतली असून शेवगावकडे जाणाऱ्या रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे कामाला नेवासा फाट्याकडून सुरू झाली आहे. यामुळे वाहनधारकांमध्ये समाधानकारक वातावरण निर्माण झाले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम