देशातील सर्वात मोठ्या ब्लॅकमेल रॅकेटचा पर्दाफाश ! हनीट्रॅप गँग बनवली आणि…

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :-  दिल्ली विद्यापीठात शिक्षणावेळी युवक आणि युवतींमध्ये प्रेम जडलं. त्यानंतर दोघांनी लग्न केले आणि स्वत:ची हनीट्रॅप गँग बनवली. दिल्ली पोलिसांनी सध्या लोकांची फसवणूक करणाऱ्या दाम्पत्यासह ५ जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी सायबर गुन्ह्यात जो खुलासा उघड केलाय तो धक्कादायक आहे. पोलिसांनी या प्रकरणी योगेश आणि सपना यांच्यासह ५ जणांना अटक केली आहे.

गेल्या ३ वर्षात या दाम्पत्याने ३ युवतींना हाताशी धरत तब्बल ५०० जणांची फसवणूक केली आहे. या लोकांकडून कोट्यवधीची वसूली करत दोघं दाम्पत्य मौजमज्जा करत होते. हे पती-पत्नी अन्य राज्यातील लोकांना ब्लॅकमेल करीत होते. आतापर्यंत यांनी अनेकांकडून कोट्यवधी रूपये उकळले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

बऱ्याच काळापासून हा ग्रुप लोकांना ठगत होता. गाझियाबाद पोलिसांनी राजकोट येथील व्यक्तीच्या तक्रारीनंतर या गँगचा पर्दाफाश केला. तुषार नावाच्या व्यक्तीने राजकोटमध्ये तक्रार दाखल केली होती. त्याला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून ८० लाख रूपये उकळण्यात आले.

या गँगकडून अनेक पॉर्न व्हिडीओ, आपत्तीजनक सामग्री, लॅपटॉप, मोबाईल, अश्लील सीडी, मेमरी कार्ड, पेन ड्रायईव्ह, रोख रक्कम, चांदीचे दागिने जप्त केले असून, ८ बँक खात्यांची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. ही गँग नाशिक, दिल्ली-एनसीआरमध्ये सक्रीय होती.

राजकोटमधील एका व्यक्तीला ठगून त्यांनी लाखो रूपये लूटले होते.या गँगच्या म्होरक्याची पत्नी काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या संपर्कात आली होती. त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करण्याची आयडिया मिळाली. दोन वर्षांपासून हे पती-पत्नी मिळून ही गँग चालवित होते.

हे दोघे मुलांना पैसे देण्याचे आश्वासन देऊन अश्लील व्हॉईसकॉल आणि न्यूड व्हिडीओ कॉल करण्यास सांगत होते. यात जे लोक अडकायचे त्यांना पर्सनल व्हॉट्सअॅप क्रमांक देऊन अश्लील व्हिडीओ चॅट करीत होते,

अशी माहिती गाझियाबाद सिटी एसपी निपुण अग्रवाल यांनी दिली. जी मुलगी व्हिडीओ चॅट करायची तिला महिन्याला २५ हजार आणि जी केवळ कॉल करायची तिला महिन्याला १० हजार रूपये दिले जात होते.

एका वेबसाईटवर आपला बनावट आयडी तयार करून हा प्रकार केला जात होता. एखाद्या व्यक्तीला आपल्या जाळ्यात ओढून नंतर धमकी देत त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल केली जायची, असेही पोलिसांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe