Apple iPhone 14 Offer : सध्या आयफोन 14 वर खूप मोठी सवलत मिळत आहे. सध्या तो फ्लिपकार्टवर तो खूप मोठ्या सवलतींसह उपलब्ध आहे. कारण या फोनवर उपलब्ध फ्लॅट डिस्काउंट, बँक ऑफर आणि एक्सचेंज बोनसचा फायदा घेऊन तुम्ही हा फोन सगळ्यात कमी किमतीत विकत घेऊ शकता.
तसेच कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी या फोनमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे हा फोन इतर कंपन्यांना टक्कर देत आहे. त्यामुळे iPhone 14 वर मिळत असलेल्या ऑफरबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
फ्लिपकार्टवर तुम्हाला बऱ्याच ऑफर दिल्या जात आहेत, ज्या अंतर्गत तुम्हाला हा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करता येत आहे. मार्केटमध्ये iPhone 14 च्या 128GB इंटरनल स्टोरेज वेरिएंटची किंमत 79,900 रुपये इतकी आहे, परंतु फ्लिपकार्टवर या फोनवर काही हजार रुपयांची सवलत दिली जात आहे.
जाणून घ्या सवलत आणि ऑफर
जर तुम्ही फ्लिपकार्टवरून iPhone 14 खरेदी करत असाल तर तुम्हाला तो 72,499 रुपयांना खरेदी करू शकता. तसेच कंपनी फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवर 5 टक्के कॅशबॅक देत आहे. जर तुम्ही एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डने पैसे देऊन फोन विकत घेतला तर, तुम्हाला 4,000 रुपयांपर्यंत सूट मिळेल.
या फोनवर 23,000 रुपयांच्या एक्सचेंज ऑफरचा लाभही दिला जात आहे. जर तुम्हाला सर्व ऑफर्सचा लाभ मिळाला तर तुम्ही हा स्मार्टफोन कमी किमतीत खरेदी करू शकता. जर तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत असेल तेव्हाच तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ दिला जाईल.
असे आहेत स्पेसिफिकेशन
स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर या iPhone 14 मध्ये तुम्हाला 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळेल. हा फोन a15 बायोनिक चिपसेटवर काम करतो ज्यात 128GB/256GB आणि 512GB स्टोरेजचा पर्याय उपलब्ध आहे.
तसेच कॅमेरा बद्दल बोलायचे झाल्यास हा फोन डुअल कॅमेरा सेटअप सह येतो ज्यामध्ये तुम्हाला 12 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा मिळतो. फ्रंटमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 12-मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे.