अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :- त्याच्याकडील दुचाकी ताब्यात घेऊन त्याला चोप दिला.
याप्रकरणी गोरक्षनाथ गडावरील देवस्थानचे कर्मचारी देविदास विठ्ठल कदम (वय 35 रा. मांजरसुंबा) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्याने गोरक्षनाथ मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्या चोरट्याने गडावरून देवस्थानचे कर्मचारी कदम यांची दुचाकी (एमएच 16 बीडी 7525) चोरली. निंबळक शिवारात त्या दुचाकी चोरट्याला काही
नागरिकांनी पकडले. त्याला चोप दिल्यानंतर याबाबतची माहिती एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्या चोरट्याला ताब्यात घेतले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम