अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :- इंग्लंडमध्ये कोरोना उपचाराकरीता महत्वाच्या आणि उपयुक्त समजल्या जाणाऱ्या अँटीव्हायरल गोळीच्या सशर्त वापरास मान्यता देण्यात आली आहे.
कोरोनावरील ही गोळी जगातील पहिली गोळी आहे. ही गोळी किती लवकर उपलब्ध होईल हे स्पष्ट नसले तरी या गोळीवर उपचार करणे योग्य असल्याचे ओळखणारा इंग्लंड हा पहिला देश आहे. १८ वर्षांच्या पुढील लोकांना कोरोना संक्रमित लोकांना ही गोळी वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे.
कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांना ही गोळी दिवसांतून तीन वेळा घ्यावी लागणार आहे. हि अँटीव्हायरल गोळी कोरोनाची लक्षणे कमी करते. रुग्णाला लवकर बरे होण्यास मदत करते. रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी आणि गरीब देशांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकते.
ही गोळी साथीच्या रोगाशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन पद्धती, औषधोपचार आणि प्रतिबंध यासाठी उपयुक्त ठरेल”, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. इंग्लंडचे आरोग्य मंत्री साजिद जाविद म्हणाले, “आमच्या देशासाठी हा एक ऐतिहासिक दिवस आहे.
इंग्लंड जगातील पहिला देश आहे ज्याने अशा अँटीव्हायरसला मान्यता दिली आहे जे करोनावर उपचारासाठी घरीच घेतल्या जाते.” अमेरीका, युरोप आणि इतर काही देशांतील संबंधित या औषधाचा आढावा घेत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम