स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस पलटली

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  मध्यप्रदेश परिवहन महामंडळाच्या एका बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटून बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. केवळ दैव बलवत्तर म्हणून या बसमधील सर्व २५ प्रवाश्यांचा जीव बालंबाल वाचला.

किरकोळ जखमा व मुकामार वगळता प्रवाशांस गंभीर दुखापत झाली नाही. सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. मध्यप्रदेश परिवहन महामंडळाची पुणे- इंदोर ही बस पुण्यावरून इंदोरला जाण्यासाठी निघाली होती.

नगर-मनमाड महामार्गावर राहाता येथील न्यायालय जवळ ती आली असता सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास गाडीचा स्टेरिंग रॉड तुटला.त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले.

परंतु प्रसंगावधान राखत चालकाने गाडी नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. गाडी रस्त्याच्या कडेला एकाबाजूने पलटी झाली. या बसमध्ये सुमारे २५ प्रवासी होते. सर्वांचा जीव टांगणीला लागला होता.

बस एका बाजूला कानडी होऊन पडली.त्यामुळे मोठा अनर्थ टळला. चालक-वाहक यांचेसह सर्व प्रवाशांचे जीव वाचले. अपघातस्थळा जवळ असलेल्या वस्तीवरील तरुणांनी मदतीसाठी मोठी धावपळ केली.

या तरुणांनी तातडीने बस मधील सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढले.तातडीने औषधोपचारांची गरज असणाऱ्या प्रवाशांना राहाता येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेतून उपचारार्थ दाखल केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe