अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :- सर्वसामांन्याना परवडेल असा स्वस्त आणि मस्त मोबाईल लॉन्च केला आहे. Jio Phone Next ला टक्कर देणारा हा मोबाईल असेल, असंही म्हटलं जात आहे.
कंपनीने हा मोबाईल आता विक्रीसाठी उपलब्ध करुन दिला आहे. यूझर्ससाठी या मोबाईलमध्ये HD Voice Call चा ऑप्शन देण्यात आलेला आहे.
सोबतच यामध्ये 4G कनेक्टीव्हीटी आहे. मोबाईलच्या बाजूच्या भागात मोठ्या आकारचे बटणही देण्यात आले आहेत.
या मोबाईलचे Specifications काय आहेत, हे जाणून घेऊयात Nokia 110 4G या मोबाईलमध्ये बॅक कॅमेरा, टॉर्च, इंटरनेट आणि वायरलेस FM सारखे भन्नाट फीचर्स आहेत.
तसेच मोबाईलमध्ये MP3 प्लेअर आणि 3 in 1 स्पीकर आणि गेम्सही आहेत. या मोबाईलचा बॅटरी लाईफही दमदार आहे.
हा Nokia 110 4G मोबाईल ई-कॉमर्स वेबसाईटवरुन खरेदी करता येणार आहे. तसेच Nokia.com/Phones या अधिकृत वेबसाईटवरुनही मोबाईल बूक करता येईल.
या मोबाईलची किंमत केवळ 2 हजार 799 रुपये इतकी आहे. हा मोबाईल Yellow, Black आणि Aqua या तीन रंगामध्ये उपलब्ध आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम