मुख्यमंत्र्यांना बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला, तो विसर जागृत करण्यासाठी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचू; रवी राणा

Published on -

अमरावती : आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना हनुमान चालीसा वाचण्याचा सल्ला देत त्यांच्यावर टीका केली आहे.

राणा म्हणाले, हनुमानाच्या मंदिरात भोंगा लावणार आहोत. हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) वाचन करत असताना भोंगा नसलेल्या मंदिरांसाठी भोंग्यांचं वाटपसुद्धा करणार आहोत.

राममंदिरात सुंदरकांड झालं पाहिजे. यासाठी राम मंदिरातसुद्धा आम्ही भोंग्यांचं वाटप करणार आहोत, असे राणा यांनी ठणकावून सांगितले आहे.

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा हनुमान जयंतीच्या पर्वावर हनुमान चालीसा वाचला पाहिजे. उद्धव ठाकरे हनुमान चालीसा वाचत नसतील, तर बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला आहे. तो विसर जागृत करण्यासाठी हनुमान जयंतीनंतर मातोश्रीवर (Matoshri) जाऊन हनुमान चालीसा वाचू. असे रवी राणा म्हणाले आहे.

त्याचसोबत बाळासाहेबांच्या विचारांचा त्यांना जो विसर पडला आहे. याची उद्धव ठाकरे यांना जाणीव करून देऊ. यातून एक धार्मिक संदेश देणार असल्याचे आमदार रवी राणा म्हणाले आहेत.

दरम्यान, येत्या हनुमान जयंतीला हनुमान मंदिरात जाऊन मी आणि आमदार रवी राणा आम्ही दोघेही हनुमान चालीसाचे पठण करणार आहोत. तसेच हनुमान मंदिरावर भोंगा देखील लावणार आहोत, असं वक्तव्य अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News