सोनिया गांधी आणि शरद पवारांच्या समोर झुकल्याने मुख्यमंत्र्यांना मानेचा त्रास होतोय

Content Team
Published:

मुंबई : भाजप (Bjp) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राष्ट्रवादीचे (Sharad Pawar) शरद पवार यांच्या समोर झुकल्याने मुख्यमंत्र्यांना मानेचा त्रास होतोय, असा खोचक टोला लगावला आहे.

नितेश राणे नक्की काय म्हणाले?

उद्धव ठाकरेंनी नवं हिंदुत्वाची भाषा करायची विसरावी, त्यांनी स्वतःला सेक्युलर (Secular) म्हणायला सुरू करावं , घाबरतात कशाला ? असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

तसेच सोनिया गांधी आणि शरद पवारांच्या समोर झुकताय म्हणून तर मुख्यमंत्र्यांना मानेचा त्रास होतोय, नवं हिंदुत्व सोडून द्या , तुमच्या तोंडी ते शोभत नाही, तसेच चला आता सोडा त्या उद्धव ठाकरेंना ते स्टेरॉइड (Steroids) घेऊन बोलतात, अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

“चल दाखव, तुझे पोलीस हटव,,आणि दादागिरी करायला रस्त्यावर उत्तर. पोलीस २४ तास तुझ्या आजूबाजूची हटव , तुझ्या दोन्ही पोरांना घेऊन स्वतः रस्त्यावर खाली उतर, बंगल्यात बसू नकोस” असा मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांनी टीका केली आहे.

तर नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याबाबतही त्यांनी पुन्हा भाष्य केले आहे. आता बदल झालाच पाहिजे. आत मध्ये छळ सुरू आहे. मलाही कोल्हापुरात इंजेक्शन देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता.

खार पोलीस स्टेशनला पोलीस रात्री घेऊन गेले, मग संताक्रूजला. त्यांना साधा पंखा दिला नाही, कालपासून रुग्णालयात नेण्यास बोलतात, तरीही त्यांना जेजे मध्ये घेऊन जात नाहीत, त्यांची तपासणी होऊ देत नाहीत, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe