अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :- मागच्या 4 दिवसांपासून अहमदनगर जिल्हा थंडीने गारठला असून, गुरुवारी पहाटेपासून दुपारी उशिरापर्यंत ढगाळ हवामान त्यात पडलेले धुके आणि बोचऱ्या थंडीमुळे नगरकर चांगलेच गारठले होते.
जिल्ह्यात पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीमुळे रात्री बरोबरच सकाळी ही शेकोट्या पेटवाव्या लागत आहेत. दुपारी उशिरा सुर्यदर्शन झाले तरी हवेतील गारठा मात्र कायम होता.
बुधवार पाठोपाठ नगर जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर थंड आणि झोंबणारे वारे वाहत असल्याने नगरकर चांगकेच गारठून गेले होते. अनेकांनी आपल्या घरात हिटर तसेच शेकोटीचा आधार घेतला.
तसेच घरच्या बाहेर जाताना स्वेटर, कानटोपी, हातमोजे असे गरम कपडे घालून नागरिक बाहेर जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरांमध्ये अघोषित संचारबंदी असल्याचे चित्र पहावयास मिळत होते.
नगरमध्ये बुधवारी 14 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. तर गुरुवारी काहीशी घट होऊन तापमान 13.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले असल्याची माहिती हवामान खात्याच्यावतीने देण्यात आली.
नगरसह संपूर्ण राज्यातच थंडीची लाट आलेली दिसून येत आहे. वाढत्या थंडीमुळे ग्रामीण भागातून शहरात येत घरोघरी दूध पोचवणाऱ्या दूध विक्रेत्यांना ही थंडीने चांगलेच गारठले आहे.
पाणी अतिशय थंड पडल्याने अनेकांना सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे असे त्रास सुरू झाले आहे. तसेच थंडीमुळे नागरिकांची चहा पिण्यासाठी गर्दी पहावयास मिळत आहे
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम