अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- जिल्ह्यात बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या कराव्या लागणार आहेत. तरच कोरोना संसर्ग साखळी तोडण्यात यशस्वी होऊ.
त्यासाठी, तालुकास्तरीय यंत्रणा आणि महापालिकेने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी आज तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून कोरोना उपाययोजनाबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले की, दैनंदिन चाचण्यांची संख्या आता वाढविली आहे. त्याप्रमाणे काही तालुक्यांत तसेच नगरपालिका क्षेत्रात चाचण्या होत आहेत.
मात्र कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवणे आवश्यक आहे. दरम्यान नुकतेच जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे.
तर संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता उपाययोजना करण्याचे गरजेचे आहे. कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी जिल्हाप्रशासन कामाला लागले आहे.
सध्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या घेणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन भोसले यांनी केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम