‘कोरोना पास’ शिक्का पुसला जाणार, पण हे करावे लागणार

Published on -

Maharashtra News:कोरोनाकाळात ऑनलाइन परीक्षेत विद्यार्थी सहज पास झाले असले, त्यांच्यावर ‘करोना पास’चा शिक्का बसला आहे.

या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका विशेष योजनेची घोषणा विधिमंडळात केली.

कोरोनाकालावधीत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये ब्रिज कोर्स सुरू करण्यात येणार आहेत.

कोरोनाकाळात शिक्षणात अडथळा आल्याने विद्यार्थ्यांना काही विषय समजत नाहीत. त्यामुळे त्यांना आकलन न झालेले घटक निश्चित करून गरजेप्रमाणे अध्यापन वर्ग आयोजित करण्यात येईल.

प्रत्येक विषयाच्या आवश्यकतेनुसार किमान पाच तासिका आयोजित करायच्या आहेत. सेतू अध्ययन उपक्रमाचे वेळापत्रक कॉलेजांनी करून त्याची अंमलबजावणी करायची आहे.

शक्यतो सत्र सुरू होतानाच विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करून त्यांना मदत करणे अपेक्षित आहे. प्रथम सत्रात हा उपक्रम १५ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करायचा आहे, तर दुसरे सत्र सुरू झाल्यानंतर एक महिन्यात पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली आहे.

कोरोनाकाळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी हा अतिरिक्त शैक्षणिक उपक्रम आहे व त्यामध्ये सहभागी व्हावे अथवा नाही हे ठरविण्याची विद्यार्थ्यांना मोकळीक असेल. या उपक्रमाची जबाबदारी कॉलेजचे प्राचार्य आणि प्रत्येक विषय शिक्षकावर देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News