Senior Citizen : जर तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवून जास्त परतावा मिळवायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खुप फायद्याची आहे. कारण ॲक्सिस बँकेने पुन्हा एकदा फिक्स्ड डिपॉझिटचा व्याजदर वाढवला आहे.
परंतु, फक्त ज्येष्ठ नागरिकांनाच याचा फायदा मिळेल हे लक्षात घ्या. हा नवीन दर 27 डिसेंबर 2022 पासून लागू झाले असल्याचे बँकेनेच आपल्या अधिकृत वेबसाइटवर सांगितले आहे.

2-10 वर्षांमध्ये मुदतपूर्ती होणाऱ्या ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त 7.75% परतावा मिळू शकतो. तर इतर नागरिकांना 7% व्याजदर मिळू शकतो
असा आहे एफडी दर
ॲक्सिस बँक सात ते 45 दिवसांत परिपक्व होणाऱ्या ठेवींवर बँक 3,50 % व्याजदर देत असून 46 ते साठ दिवसांत परिपक्व होणाऱ्या ठेवींवर 4.00% व्याजदर देत आहे. त्याचबरोबर 61 दिवस ते 6 महिन्यांत मॅच्युअर होणाऱ्या ठेवींसाठी 4.50% व्याजदर, 6 महिने ते 9 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या ठेवींवर ही बँक 5.75% व्याज दर देत आहे.
नऊ महिने ते एका वर्षात परिपक्व होणाऱ्या ठेवींवर 6.00% व्याजदर, एक वर्ष ते दोन वर्षांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या ठेवींसाठी बँक आता 6.75% व्याजदर मिळेल. तसेच दोन वर्ष ते 10 वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर 7% व्याजदर देते.
ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडी दर
7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना 3.50% ते 7.75% पर्यंत व्याजदर मिळेल.
तसेच या बँकेत एखादी व्यक्ती ऑनलाइन मुदत ठेव उघडू शकते. 7 दिवसांपासून कमाल 10 वर्षांपर्यंतच्या लवचिक कालावधीसाठी 5,000 रुपये ठेवता येतात. तुमच्याकडे तुमचे एफडी व्याज पेआउट मासिक, त्रैमासिक किंवा परिपक्वतेवर प्राप्त करण्याचा पर्याय आहे.