अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर खाली दाबून वैजापूर तालुक्यात बाजाठान येथील एकाच मृत्यू झाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी हद्द पट्ट्यावर घडली आहे.
या दुर्घटनेत ज्ञानेश्वर रामू दळे (वय ३८) या व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला आहे. जेसीबीच्या सहाय्याने गोदावरी नदी पात्रात वाळू उपसा सुरू आहे.
भोसले नावाच्या वाळू तस्करांच्या शेतात भला मोठा वाळूचा साठा आहे. त्याच्याकडेच मयत तरुण कामावर होता. दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी कि, मयत तरुण ज्ञानेश्वर दळे याचे घटने अगोदर अर्धा तास वडीलांशी फोनवर बोलणे झाले.
यावेळी वडिलांनी ज्ञानेश्वरला एवढा उशीर का झाला म्हणून विचारले देखील होते. मात्र अवघ्या काही वेळातच श्रीरामपुरला साखर कामगार रूग्णालयात ज्ञानेश्वरला दाखल केल्याचा निरोप आला.
दरम्यान पाऊस येणार म्हणून वाळू तस्कर सुसाट वाळू वाहतूक करत होते. ज्ञानेश्वरला घरी जाण्यास मज्जाव करत असावे, या वादातून आम्हाला घातपात झाल्याचा संशय येत असल्याची तक्रार वडील रामू दळे यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम