सर्वांत वयोवृद्ध वाघ ‘वाघडोह’चा मृत्यू, वाचा नेमके काय झाले?

Ahmednagarlive24 office
Published:

Maharashtra News : राज्यातील सर्वांत वयोवृद्ध वाघ अशी ओळख असलेल्या ‘वाघडोह’ या वाघाचा चंद्रपूरच्या सिनाळा जंगलात मृत्यू झाला आहे. तो १७ वर्षांचा होता.

एवढ्या वयाचा राज्यातील हा एकमेव वाघ असल्याचे सांगितले जाते. त्याचा मृत्यू वृध्दापकाळाने म्हणजे नैसर्गिक मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.वाघडोह हा वाघ प्रचंड धिप्पाड होता. प्रारंभीचा काळ ताडोबा व्याघ्र प्रकल्पात घालवल्यानंतर युवा वाघांनी त्याला वृद्धापकाळात बाहेर हुसकावले होते.

तेव्हापासून तो ताडोबाच्या बफर क्षेत्रालगत असलेल्या जंगलात भटकत होता. वय वाढल्याने शिकार करण्यावर मर्यादा आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्याचा जर्जर अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल झाला होता.

आज सिनाळा जंगलात त्याचा मृतदेह आढळून आला. त्याचे सर्व अवयव शाबूत असून कोणत्याही जखमांच्या खुणा नाहीत, त्यामुळे त्याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe