नगरमध्ये लॉकडाऊन बाबत झाला हा निर्णय; जिल्हाधिकारी म्हणाले…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:-करोनाची रुग्ण संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. यातच जिल्ह्यातील लॉकडाऊन बाबत जिल्हाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्स झाली.

या बैठकीत घेण्यात आलेल्या अनेक निर्णयाची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांनी राज्यातील करोना स्थितीचा आढावा घेतला.

या बैठकीत जिल्हाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. यावेळी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला, नगरला तूर्त लॉकडाऊन सारखे उपाय न करता अन्य उपाययोजना कडक करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

त्यानुसार जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली व या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. लग्न समारंभाला खाकी असणार तैनात सध्या शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ होत आहेत.

या काळात जिल्ह्यात विविध ठिकाणी ४४ विवाह सोहळे होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्या प्रत्येक ठिकाणावर पोलीस लक्ष ठेवणार आहेत.

जेथे लग्न आहे, तेथे सकाळीच पोलीस दाखल होतील. जर नियम मोडला गेला तर संबंधितांना दंड केला जाईल. हॉटेलवरही असणार करडी नजर कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे प्रशासनाकडून हॉटेलवरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

त्यांना पन्नास टक्के क्षमतेनेच ग्राहकांना प्रवेश देण्याची परवानगी आहे. त्यामुळे पोलिसांमार्फत अचानकपणे तपासणी केली जाणार आहे.

शाळा सुरु होणार कि नाही? समिती करणार पाहणी शाळा-महाविद्यालये यासंबंधी अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

ही समिती पाहणी करून तीन दिवसांत अहवाल देणार आहे. त्यानंतर शाळा-महाविद्यालये सुरू ठेवायची की नाही, त्याबद्दल निर्णय होईल, असेही भोसले यांनी नमूद केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe