अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- कोरोना संसर्गाच्या तिसर्या लाटेचा प्रादुर्भाव पाहता राज्यातील शाळा, कॉलेज बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. व विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान पाहता यावर पुन्हा निर्णय घेण्याची गरज निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
सध्या बंद असलेल्या शाळा उघडण्यावर सरकारमध्ये चर्चा सुरू आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या त्यासाठी सकारात्मक आहेत. या प्रस्तावावर गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाच्या वतीने मंत्रिमंडळ बैठकीत सादर केला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.
तिसर्या लाटेच्या प्रारंभी 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद ठेवल्या आहेत. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता, त्यापूर्वी शाळा उघडण्याचा निर्णय होऊ शकतो.
उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापुरात असल्याने मंत्रिमंडळाची बैठक बुधवारऐवजी गुरुवारी होणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात असल्याने शाळा लवकर उघडण्याचा निर्णय होऊ शकतो, असे संंकेत यापूर्वीच दिले आहे.
दरम्यान, राज्य कोरोना टास्क फोर्सच्या बैठकीतही यावर चर्चा होणार आहे. त्यात शाळा सुरु करण्याबाबत अनुकुलता दर्शविल्यास गुरुवारच्या बैठकीत तातडीने त्यावर निर्णय होऊ शकतो.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम