Ahmednagar Police : ‘त्या’ समाजकंटकांचे जाणिवपूर्वक गैरकृत्य; आ. जगताप म्हणाले…

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2022 Ahmednagar Police :  डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त गुरूवारी रात्री काढण्यात आलेल्या मिरवणुकीत काही समाजकंटकांकडून जाणिवपूर्वक गोंधळ घातला गेला.

याविषयी आ. संग्राम जगताप यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत काही समाजकंटकांनी जाणिवपूर्वक गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी अशा समाजकंटकांचा शोध घ्यावा, बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या सीसीटीव्हीचा आधार घेऊन झालेल्या घटनेची शहानिशा करून गोंधळ घालणार्‍यांविरूध्द कायदेशीर कारवाई करावी,

विनाकारण यामध्ये कोणालाही गोवण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून होता कामा नये, असे स्पष्ट मत आ. जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

ते पुढे बोलताना म्हणाले, कुठेतरी पोलीस प्रशासनाचा धाक कमी झाल्याचे दिसून येत आहे. पूर्वी सण-उत्सवाच्या पूर्वसंधेला अहमदनगर शहरातून रूटमार्च काढला जात होता.

आता मात्र तसे होताना दिसत नाही. शांतता कमिटी बैठका होत नाही. यामुळे समाजात कुठेतरी वातावरण दुषीत होत आहे.

काही अघटीत घडण्याची वाट पोलीस पाहात आहे का? असा प्रश्‍न उपस्थित करून आपल्याकडून कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी.

सोशल मीडियावर व्हायरल होणार्‍या मेसेजची खात्री न करता ते पुढे फॉरवर्ड करून नये, सामाजिक भावना दुखवतील असे कृत्य नागरिकांनी करून नये, असे आव्हान आ. जगताप यांनी नगर शहरातील नागरिकांना केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe