अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- संपदा पतसंस्थेच्या ठेवीदारांचे 2010 पासून 32 कोटी रुपये तसेच बनावट सोनेतारण 6 कोटी रुपये व शासनाच्या वर्ग-2 जमिनीवरती नऊ कोटी रुपये कर्ज देऊन मोठा भ्रष्टाचार केला आहे.
त्यामुळे ठेवीदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. संपदा पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानदेव वाफारे हे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहे.

महसूल मंत्री यांचा निकटवर्तीय असल्यामुळे न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी महसूल विभागाकडून केली जात नाही त्यामुळे ठेवीदारांवर मोठा अन्याय होत आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार संपदा पतसंस्थेच्या संचालकांच्या मालमत्तेचा लवकरात-लवकर निलाव करून आमच्या ठेवी व्याजासह परत करा या मागणीसाठी संपदा पतसंस्था ठेवीदारांनीजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
वाफारे हा काँग्रेसचा पुढारी असून सध्या ठेवीदारांचे पैसे बुडून वाफारे हा राजरोज पणे राजकिय पुढाऱ्यांन समवेत मिरवत आहे. त्याला महसूल मंत्री यांचा पाठिंबा आहे.
यापूर्वी असलेले मा.तहसीलदार अप्पासाहेब शिंदे हे ठेवीदारांच्या बाजूनी राहून कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता त्यांनी न्यायालयीन प्रक्रिया लढत ठेवीदारांना न्याय दिला.
परंतु तहसीलदार उमेश पाटील यांनी पुढील प्रक्रिया राबवली नसल्यामुळे ठेकेदारांवर अन्याय होत आहे असा आरोप ठेवीदारांनी यावेळी केला.
तसेच महसूल मंत्री नगर दौऱ्यावर आल्यावर त्यांना बांगड्यांचा आहेर ठेवीदार महिला देणार आहे. असे देखील आंदोलनकर्ते म्हणाले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम